

खोर : पुढारी वृत्तसेवा : देऊळगावगाडा (ता. दौंड) परिसरातील वाड्या-वस्त्यांना जोडणार्या आणि गेल्या 20 वर्षांपासून वादात असलेल्या रस्त्यावर तोडगा निघाला. हा रस्ता शुक्रवार (दि. 19) पासून खुला करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
देऊळगावगाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील वॉर्ड क्र. 2 मधील रस्ता हा 20 वर्षांपासून वादाच्या भोवर्यात होता. नारायण बेट रोड ते जाचकवस्ती, जगतापवस्ती, जामकरवस्ती, मानेवस्ती व रासकर-मोरेवस्ती हा रस्ता वादात अडकला गेला होता.
अनेकदा या रस्त्याबाबतीत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला यश येत नव्हते. दौंडचे आमदार राहुल कुल, भीमा-पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी सरपंच डी. डी. बारवकर, धनंजय शितोळे यांनी परिसरातील शेतकरी, नागरिक यांची वैयक्तिक अडचण समजावून घेत या वादावर तोडगा काढला. यातून नागरिकांचे मनोमिलन होत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.
जाचकवस्ती, जगतापवस्ती, जामकरवस्ती, मानेवस्ती व रासकर-मोरेवस्तीतील नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार आहे.
रस्ता खुला करताना भीमा-पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी सरपंच डी. डी. बारवकर, दिलीप जगताप, अकबर शेख, खंडू माने, संतोष मोरे, राजवर्धन जगतात, गोरख जगताप, धनंजय शितोळे, बाळासाहेब शितोळे, दत्ता शितोळे, सोमनाथ जगताप, रवींद्र जामकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा