यूजीसीचा दणका : देशभरातील 421 तर राज्यातील 17 विद्यापीठं डीफॉल्ट यादीत

यूजीसीचा दणका : देशभरातील 421 तर राज्यातील 17 विद्यापीठं डीफॉल्ट यादीत
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी लोकपाल नियुक्त न केल्याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगाने 421 विद्यापीठांची नावे डीफॉल्ट यादीत समाविष्ट करून सार्वजनिक करत दणका दिला आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 17 विद्यापीठांचा समावेश आहे. यूजीसीने विद्यापीठांना 31 डिसेंबरपर्यंत नियमानुसार लोकपाल नियुक्त करण्याचा इशारा दिला होता. परंतु, दिलेल्या मुदतीनंतरही विद्यापीठांनी नियमांची पूर्तता केली नाही.

या विद्यापीठांची यादी यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी जाहीर केली. महाराष्ट्रासह यूपी, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधील विद्यापीठांचा डीफॉल्ट यादीत समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक 256 राज्य विद्यापीठे आहेत. नॉर्थ- ईस्टर्न हिल्स युनिव्हर्सिटी, शिलाँग हे एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. तर 162 खासगी विद्यापीठे आणि दोन डीम्ड-टू-बी विद्यापीठे आहेत.

यामध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ वगळता राज्यातील बहुतांश सर्व राज्य विद्यापीठांची नावे आहेत. देशातील प्रसिद्ध विद्यापीठांपैकी दिल्लीतील मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि कर्नाल, हरियाणातील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. राज्य विद्यापीठांच्या यादीमध्ये यूपीमधील 27 आणि उत्तराखंडमधील 9 संस्थांचा समावेश आहे. याशिवाय दिल्लीतील चार विद्यापीठे या यादीत आहेत. यामध्ये दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, दिल्ली टीचर्स युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमन आणि डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील विद्यापीठांची नावे

  • आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, बालेवाडी, पुणे,
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, रायगड
  • डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ- मुंबई
  • गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली,
  • हैदराबाद राष्ट्रीय कॉलेजीट विद्यापीठ- वरळी
  • कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  • महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स, नाशिक
  • महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी, नागपूर
  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई
  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर
  • महात्मा कृषी विद्यापीठ, राहुरी
  • महाराष्ट्र अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, परभणी
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
  • संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अमरावती
  • श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ, मुंबई
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
  • यशवंतराव चव्हाण
  • मुक्त विद्यापीठ.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news