Pune : लष्कराच्या मध्य कमांडकडून पुनीत बालन यांचा गौरव | पुढारी

Pune : लष्कराच्या मध्य कमांडकडून पुनीत बालन यांचा गौरव

पुणे : भारतीय लष्करासमवेत विविध उपक्रमात सहभागी असलेले ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. 76 व्या लष्कर दिनानिमित विभागाचे लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांच्या हस्ते बालन यांना हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यापूर्वीही काश्मीर खोर्‍यात भारतीय सैन्यासोबत विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल सैन्य दलाचे सहसेनाध्यक्ष लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते त्यांना असेच प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले होते.

मध्य कमांडकडून देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले असून भविष्यातही त्यांनी असेच काम करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बालन यांनी काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चालविण्यात येणार्‍या दहा शाळा चालविण्यास घेतल्या आहेत. बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेले डगर स्कूलही भारतीय लष्करासमवेत चालविण्यात येत आहे.

लष्कराच्या मध्य कमांड विभागाने प्रशस्तीपत्रक देऊन केलेला गौरव ही माझ्यासाठी अत्यंत अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. लष्करासाठी सेवा म्हणून आज खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत आहे, हे मी माझे नशीब समजतो.

– पुनीत बालन, युवा उद्योजक

हेही वाचा

Back to top button