कायदा बदलला आता गाडी अन् मोबाईलचा नंबर बदलण्याची स्पर्धा

कायदा बदलला आता गाडी अन् मोबाईलचा नंबर बदलण्याची स्पर्धा
Published on
Updated on
पुणे :  वाहन असो की मोबाईल तो घेताना पहिला प्रश्न असतो तो म्हणजे नंबर कोणता घ्यायचा. आपल्या पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अनेक हौशी वाहनधारकांची धडपड सुरू असते. यामध्ये, वकील, भाई अथवा दादा म्हटलं की कायद्यातील कलमानुसार क्रमांक घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. मागील वर्षी भारतीय दंड विधान कायद्यासह कलमात बदल झाले. ते यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून लागू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने शहरातील वकिलांसह भाई, दादांनी नव्या कलमानुसार नंबर मिळविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
जन्मतारीख वा अन्य काही सुखद आठवणी किंवा जुन्या वाहनाचा लकी नंबर, आवडता अंक आदी विविध कारणांमुळे  पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांची धडपड सुरू असते. यामध्ये, शहरातील वकिलांसह भाई, दादा हेही आघाडीवर दिसून येतात. कायद्यातील कलमाचा क्रमांक आपला मोबाईल क्रमांक तसेच वाहनाच्या नंबर प्लेटवर असावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो. गुन्हेगारी, जमिनीचे वाद, कौटुंबिक हिंसाचाराचे दावे चालविणारे वकील त्यांच्या वाहन आणि मोबाईलसाठी गुन्ह्याच्या कलमांप्रमाणे क्रमांक घेण्यास प्राधान्य देत आले आहेत.
याखेरीज, बहुतांश भाई, दादाही वाहनासाठी कलमांचा क्रमांक घेऊन आपल्यावर कोणते खटले दाखल आहेत हे अप्रत्यक्षरीत्या दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यादृष्टीने संबंधित क्रमांक घेण्यास ते इच्चुक असतात.  दरम्यान, मागील वर्षी केंद्र सरकारकडून भारतीय दंड विधान कायद्याचे भारतीय न्याय संहिता असे नामांतर करण्यात आले. कायद्याबरोबरच कलमातही बदल झाले. नव्याने बदल झालेला कायदा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लागू होणार असल्याने नवीन कलम शासनाच्या पसंती क्रमांकात आहे का तसेच त्यासाठी किती खर्च होईल याबाबत शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विचारणा होऊ लागली आहे. याखेरीज, सिम कार्ड विक्रेत्यांकडेही मोबाईलसाठी नवीन सिम कार्ड घेण्यासाठी संबंधित नंबरसाठी वकील विचारणा करत असल्याचे निरीक्षण पुणे बार असोसिएशनचे माजी सदस्य अ‍ॅड. आकाश मुसळे यांकडून नोंदविण्यात आले.
भारतीय दंड विधान म्हणजेच भारतीय न्यायसंहिता हा न्यायप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, प्रॅक्टिस करणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच इतर वकिलांना लक्षात राहावे, यासाठी कलमानुसार वाहनांस क्रमांक घेण्यास प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये, गुन्हेगारीशी संबंधित कलमांचा नंबर घेण्याकडे जास्त कल दिसून येतो.
– अ‍ॅड. अजित पवार, फौजदारी वकील. 
मागील काही दिवसांत शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्हेगारी, जमिनीचे वाद, कौटुंबिक हिंसाचार या खटल्यांचे कामकाज पाहणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच आपल्या गाडीचा नंबर सर्वांना सहज लक्षात राहावा म्हणून पसंतीचा क्रमांक निवडला जातो.
– अ‍ॅड. गणेश माने, फौजदारी वकील.
हेही वाच

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news