पुणे : चोवीस तासांत शहर गारठले असून, एनडीए 9.3 तर शिवाजीनगर भागाचा पारा 10.8 अंशांवर आला आहे. दरम्यान, किमान व कमाल तापमानात तब्बल 20 वर्षांची तफावत असल्याने आरोग्य सांभाळा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. शहराच्या किमान तापमानात सोमवारपासून मोठी घट झाली. रविवारी 15 ते 20 अंशांवर असणार्या किमान तापमानात 5 ते 7 अंशांनी घट होऊन ते 9.3 ते 13 अंशांवर खाली आले, तर कमाल तापमानात दुपारी 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्याने दुपारी प्रचंड उकाडा तर रात्री व पहाटे हुडहुडी जाणवत आहे.
लवळेचा पारा 35 अंशांवर… शहरातील किमान व कमाल तापमानात मोठी दरी निर्माण झाल्याने आरोग्य सांभाळा असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. कारण दुपारचे सरासरी कमाल तापमान 28 ते 29 अंशांवरून सरासरी 32 अंशांवर गेले आहे. सर्वाधिक कमाल तापमान लवळे 35 व कोरेगाव पार्क 33 अंशांवर गेले आहे. दोन्ही तापमानात मोठी दरी निर्माण झाली आहे. एनडीए भागाच्या तापमानात 22.7 तर शिवाजीनगरच्या तापमानात 21.7 अंशांची तफावत आहे.
हेही वाचा