शरद मोहोळ खून प्रकरण : ज्या झाडावर गोळीबाराचा सराव, ते झाडच गायब

शरद मोहोळ खून प्रकरण : ज्या झाडावर गोळीबाराचा सराव, ते झाडच गायब

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गँगस्टर शरद मोहोळ याचा खून करणार्‍या आरोपींनी गोळीबाराचा सराव ज्या झाडावर केला होता, ते झाडच आता जागेवर अस्तित्वात नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शरद मोहोळ याचा खून केलेल्या साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी मुळशी तालुक्यातील हाडशी येथे गोळीबाराचा सराव केल्याची तपासादरम्यान माहिती दिली होती. त्यांनी हा गोळीबार ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात रात्री आक वाजता केल्याचे सांगितले होते.

गोविंद उभे (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या झाड्याच्या बुंध्यावर पोळेकर व इतरांनी मिळून 6 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व त्यांचे सहकारी मुळशी तालुक्यातील हाडशी येथील ते ठिकाण पाहण्यासाठी गेले होते. पोळेकर व इतर आरोपींनी पोलिसांना ते ठिकाण दाखविले. तेव्हा त्या ठिकाणी ज्या झाडावर फायरिंगचा सराव केला होता, ते झाडच त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांनी जागेच्या मूळ मालकाकडे चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news