सशस्त्र दलातील अधिकार्‍यांना घडविण्यात ‘एनडीए’चे योगदान : जनरल अनिल चौहान | पुढारी

सशस्त्र दलातील अधिकार्‍यांना घडविण्यात ‘एनडीए’चे योगदान : जनरल अनिल चौहान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माझ्या घरी लष्करी दलाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी वयाच्या 16 व्या वर्षी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) मध्ये आलो. आज संरक्षणदल प्रमुख म्हणून उभा आहे. एनडीए आमची आई आहे. तिनेच आम्हाला घडवले, असे भावोद्गार देशाचे संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी येथे काढले. संरक्षणदल प्रमुख चौहान यांच्या उपस्थितीत पुण्यातील खडकवासला भागातील एनडीएच्या 75 व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.  अमिताभ बच्चन यांचा आवाजात तयार केलेल्या एनडीए वरचा लघुपट, दोन पुस्तकांचे विमोचन संपन्न झाले. यावेळी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरिकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एनडीएतील विविध शाखांत शिकणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठी उपस्थिती होती.

एनडीए काळाच्या कसोटीवर टिकून

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) राष्ट्राच्या सशस्त्र दलांच्या कार्यावर प्रभाव टाकला आहे. तो काळाच्या कसोटीवर टिकून आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा समृद्ध इतिहास स्वतंत्र भारताच्या बरोबरीने प्रवास करत आहे.या अकादमीने सशस्त्र दलांना सोपवलेल्या कार्यांची पूर्तता करण्यासाठी अधिका-यांना तयार करण्यात मोठी भूमिका निभावली आहे, असे उदगार जनरल चौहान यांनी काढले.

हेही वाचा

Back to top button