पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्राजवळील जलवाहिनीची दुरुस्ती, तसेच पाणीपुरवठाविषयक दुरुस्ती कामामुळे गुरुवारी (दि.18) पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अशुद्ध जलउपसा केंद्रापासून येणार्या उच्च दाबाच्या पंपिंग मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्याचे काम सुरू आहे. केंद्रातील विद्युत विषयक नियमित देखभाल, दुरुस्ती व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे.
त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.19) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून काटकरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
हेही वाचा