Crime News : सराईत चोरटे अटकेत; 1 किलो सोने जप्त | पुढारी

Crime News : सराईत चोरटे अटकेत; 1 किलो सोने जप्त

चाकण : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणार्‍या दोन सराईताना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल एक किलो सात तोळे वजनाचे सोने जप्त केले. तसेच घरफोडीचे 18 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. आमिर शब्बीर शेख (वय 25, रा. निगडी -प्राधिकरण) व सोहेल शफीक पठाण ( वय 23, रा.निमगाव) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळूंगे एमआयडीसी परिसरात घरफोडी करणार्‍या सराईतांचा शोध घेत असताना पोलिसांनी 9 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आरोपी लाल रंगाची स्कूटी घेऊन संशयीतरित्या रेकी करत असल्याचे दिसले.

त्यानुसार पोलिसांनी मोई, चिंबळी फाटा, कुरुळी परिसरात तपास घेतला असता दोन संशयीत स्कुटीवरून फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले 29 लाख 3 हजार 400 रुपयांचे 47.8 तोळे सोने, रोख 3 लाख रुपये व दुचाकी जप्त केली.

ही कारवाई एमआयडीसी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर , पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, प्रदीप गायकवाड, दिनेश चव्हाण, पोलिस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, राजू जाधव, पोलिस नाईक संतोष काळे, किशोर सांगळे, पोलिस जवान शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे.

घरफोडीचे 18 गुन्हे उघडकीस

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपी हे तळेगाव, इंदोरी, मोशी, चिखली, येलवाडी, सदुंबरे या परिसरात बंद बंगल्यांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. पोलिस तपासात एकूण 18 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. यात पोलिसांनी 44 लाख 33 हजार 400 रुपयांचे 1 किलो 7 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले.

हेही वाचा

Back to top button