सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल

सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावर रविवारी (दि. 14) मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळीच गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने गडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लहान मुले, महिलांसह पर्यटकांचे
हाल झाले. दिवसभरात वाहनचालक पर्यटकांकडून वनविभागाने तब्बल 1 लाख 27 हजार रुपयांचा टोल गोळा केला.

खडकवासला धरण चौपाटीसह राजगड, तोरणा गडकोट गजबजले होते. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या
संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याने सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन कोलमडले. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्यासह वनरक्षक, सुरक्षा रक्षकांनी धावपळ करत टप्प्या-टप्प्याने वाहने सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. सिंहगडावर दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 536 व दुचाकी 1470 वाहने गेली. वाहनतळ पूर्ण क्षमतेने फुल्ल होऊन जागा मिळेल तेथे पर्यटकांनी वाहने उभी केली. त्यामुळे थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news