crime news : पिस्तूल, काडतुसासह संशयित ताब्यात

file photo
file photo

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या बारामती शहरातील युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रोहित ऊर्फ बापू निकम (वय 31 , रा. श्रीराम नगर बारामती) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरारी आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी एलसीबीचे पथक तयार करण्यात आले होते.

10 जानेवारीला पथक फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती शहरात पेट्रोलिंग सुरू होते. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली. रोहित ऊर्फ बापू निकम याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आहे. तोदेखील सध्या श्रीराम नगर-भिगवण रस्त्यालगत कोणाचीतरी वाट बघत थांबला असून, त्याचे कमरेला पँटच्या आतील बाजूस एक गावठी पिस्तूल लावल्याचे त्यांना समजले. पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री करत त्यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी त्याचे विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलम 3 (25 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलिस हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल आहीवळे, पोलिस नाईक नीलेश शिंदे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news