डेक्कन जिमखाना भागातील वाहतुकीत आज बदल | पुढारी

डेक्कन जिमखाना भागातील वाहतुकीत आज बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हेरेटेज हँन्डव्हिविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टकडून उद्या शुक्रवारी (दि.12 जानेवारी) वस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी पाच ते दहा या वेळेत फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळी पाच ते दहा या वेळेत डेक्कन जिमखाना परिसरातील गरवारे पूल ते गोखले स्मारक चौकदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
कर्वे रस्त्यावरून फर्ग्युसन रस्त्याकडे जाणार्‍या वाहनचालकांनी एसएनडीटी महाविद्यालय, आठवले चौक, विधी महाविद्यालय रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे येणार्‍या वाहनांनी कर्वे रस्ता, प्रभात रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गोखले स्मारक चौक ते नटराज चौक दरम्यानचा रस्ता कार्यक्रमानिमित्त तात्पुरता दुहेरी करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button