तलावात सापडलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

तलावात सापडलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह
Published on
Updated on

पौड : पुढारी वृत्तसेवा :  भूगाव येथे असलेल्या तलावात एक कार मिळून आली असून त्या कारमध्ये रामदास हरिचंद्र पवार (वय 40, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांचा मृतदेह मिळाला. आपत्ती व्यवस्थापन समिती आणि पौड पोलिसांनी ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, भूगाव हद्दीत हॉटेल सरोवरच्या समोरील मानस तलावामध्ये एका चारचाकीचा मागील भाग तरंगताना दिसत असल्याची माहिती नागरिकांनी 112 या हेल्पलाईन नंबरला दिली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने गाडी बाहेर ओढून काढली असता ती गाडी स्कोडा (एमएच 14 सीवाय 0010) असल्याचे समजले. त्यावेळी गाडीत मागील सीटवर एकजण तरंगत होता.

गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून गाडीतील बॅगेची तपासणी केली असता आधार कार्डवर रामदास हरिचंद्र पवार असल्याचे दिसून आले. मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस नाईक सिध्देश पाटील, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, धनजंय मानकर, तेजस जाधव, अभिजित खोले, हनुमंत नवले यांच्या पथकाने हा मृतदेह व गाडी बाहेर काढली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news