शरण येण्याबाबत केला पोलिसांना कॉल; वकिलांची न्यायालयासमोर साक्ष

शरण येण्याबाबत केला पोलिसांना कॉल; वकिलांची न्यायालयासमोर साक्ष

पुणे : कुख्यात शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधत खून केला असून शरण यायचे असल्याचे सांगितले. आम्ही आरोपींना भेटून सरेंडर होण्याचा सल्ला देत होतो. याबाबत, आम्ही पोलिसांनाही संपर्क केला. यादरम्यान, त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलिस पथक आले. त्यांनाही आम्ही हेच सांगत होतो. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही, असे शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने वकिलांना 8 जानेवारी तर अन्य सहा जणांना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटक करण्यात आलेले वकील दोघेही बार असोसिएशनचे सदस्य आहेत.
साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उढाण यांना  शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अन् त्या वकिलाला  रडू कोसळले

आम्ही गेल्या 15 वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहे. आम्ही काही केलेले नाही असे सांगतानाच आरोपी वकिलाला न्यायालयात रडू कोसळले. तेव्हा न्यायालयाने तुम्ही काहीही केले नसेल तर घाबरायची गरज नाही असे सांगून न्यायालयाने त्यांना आश्वस्त केले.

न्यायालय कक्ष वकिलांच्या गर्दीने तुडुंब

गुन्ह्यात वकिलाला अटक केल्याने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांचा कक्ष गर्दीने फुलून गेला होता. यामध्ये, मोठ्या संख्येने वकीलवर्ग उपस्थित होता. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news