ब्रिटनमध्ये दिसला दुर्मीळ पाईन मार्टन्स | पुढारी

ब्रिटनमध्ये दिसला दुर्मीळ पाईन मार्टन्स

लंडन : ‘पाईन मार्टन्स’ ही सस्तन प्राण्यांची युरोपमध्ये आढळणारी एक दुर्मीळ प्रजाती आहे. नुकतेच ब्रिटनमध्ये या दुर्मीळ प्राण्याची झलक दिसून आली. ही झलक झाडांवर लावलेल्या कॅमेर्‍यांनी टिपली आहे. श्रॉपशायरमधील जंगलातील झाडांवर हे कॅमेरे लावले होते. त्यांनी या प्राण्याची छबी टिपून घेतली आहे.

कोल्ह्यासारख्या दिसणार्‍या या छोट्या प्राण्यांचा छडा लावणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठी श्रॉपशायर पाईन मार्टन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. त्यासाठी तेथील डोंगराळ भागातील झाडांवर तीस डेन बॉक्सेस बसवण्यात आले होते. पक्ष्यांची घरटी असावीत तशा या पेट्या असतात व त्याचा वापर असे पाईन मार्टन्स प्राणी विश्रांतीसाठी करतात.

श्रॉपशायरमध्ये 2015 मध्ये या प्राण्यांचे दीर्घकाळानंतर पुन्हा दर्शन झाले होते. त्यानंतर त्यांच्या संवर्धनासाठी मोहीम आखण्यात आली होती. प्रोजेक्ट लीडर स्टुअर्ट एडमंड यांनी सांगितले की तेथील जमीनमालकांना असे अनेक डेन बॉक्सेस बसवण्याबाबत सांगितले जात आहे. अशा डेन बॉक्सेसजवळ झाडांवर कॅमेरेही लावले आहेत जेणेकरून या दुर्मीळ प्राण्यांची माहिती समजेल. आता अशाच एका कॅमेर्‍याने या पाईन मार्टेनची छबी टिपली आहे.

Back to top button