तळेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ | पुढारी

तळेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ बुधवारी (दि.03)माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे हस्ते करण्यात आला.ही यात्रा सरकारने समाजातील विविध स्तरातील सर्व व्यक्तींपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी सुरू केलेली विकसित भारत संकल्प यात्रा आहे. यावेळी स्वागत सचिन टकले यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील,उपमुख्याधिकारी ममता राठोड, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा निवडणुक प्रमुख रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, चित्रा जगनाडे, भाजपा शहराध्यक्ष अशोक दाभाडे, ग्रामविकास व पंचायत राज विभाग पश्चिम महाराष्ट्र संयोजक सचिन टकले, अनिल वेदपाठक, शोभा भेगडे यांचेसह माजी नगरसेवक, भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले.

केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा आली. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली आहे. विविध कल्याणकारी योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा व सर्वांना या योजनांची माहिती व्हावी हा या विकसित भारत संकल्प यात्रेचा मूळ हेतू आहे. शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे नगरपरिषद कार्यालय, मारुती मंदिर चौक स्टेशन भागात मराठा क्रांती चौक येथे आगमन झाले. यावेळी शहरातून सुमारे १४६० लाभार्थी सहभागी झाले होते वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांनी माहिती घेतली.

नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री स्वनिधी से समृद्धी, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्यमान भारत योजना, आरोग्य विभाग योजना, आधार अपडेट, स्वच्छ भारत अभियान (नागरी) प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, बँकामार्फत विविध कर्ज योजना, आदी योजनांची माहिती नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली. विविध योजनांची माहिती देणारी छायाचित्रे व जनजागृती पर बॅनर पोस्टर्स या रथावर लावण्यात आलेली आहेत. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. यावेळी आपला संकल्प विकसित भारत शपथ देण्यात आली.

हेही वाचा

Back to top button