गुंड अनुज यादवसह सहा जणांवर मोक्का; पुणे पोलिस आयुक्तांची कारवाई | पुढारी

गुंड अनुज यादवसह सहा जणांवर मोक्का; पुणे पोलिस आयुक्तांची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चंदननगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुंड अनुज यादवसह त्याच्या सहा साथीदारांवर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कान्वये केलेली ही 110 वी कारवाई आहे. टोळीप्रमुख अनुज जितेंद्र यादव (वय 19, रा. गंगोत्री निवास, वडगाव शेरी, पुणे), हरिकेश टुणटुण चव्हाण (वय 18, रा.आनंदपार्क, वडगाव शेरी), आकाश भारत पवार (वय 23, रा. वडगाव शेरी), अमोल वसंत चोरघडे (वय 23, रा. वडगाव शेरी), संदेश सुधीर कांबळे (वय 25, रा. वडगाव शेरी,) अक्षत निश्चल ताकपेरे (वय 20, रा. वडगाव शेरी), राहुल विनोद बारवसा (वय 23, रा. वडगाव शेरी) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सराईत अनुज जितेंद्र यादव याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य करत 10 वर्षांत खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे असे गुन्हे केले होते. टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर आयुक्त रंजन कुमार, उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक मनिषा पाटील, उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे, संजय गायकवाड, राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली.

हेही वाचा

Back to top button