Pune Crime News : पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खराडी बायपास परिसरात पिस्तुलासह फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले असून, आरोपीवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे पाच ते सहा गुन्हे
दाखल आहेत. राकेश शंकर ठोकळ (वय 23, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ठोकळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विमानतळ पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान खराडी बायपास परिसरात एकजण संशयितरीत्या थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार शैलेश नाईक व सचिन जाधव यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने सापळा रचून ठोकळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. तपासात त्याने अवैधरीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याने हे पिस्तूल नेमके कोठून आणले, याबाबत विमानतळ पोलिस तपास करत आहेत. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन, अंमलदार सचिन कदम, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, राकेश चांदेकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news