Pune News : शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी | पुढारी

Pune News : शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समाजातील विशिष्ट घटकाचा रोष पत्करून स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी (दि. 4) पुणे शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, विविध संघटना, सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने समताभूमीतील क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या वेळी महिला शहराध्यक्षा वंदना पवार, दीना शेखर, प्रतिभा गायकवाड, नीलम सोनवणे आदी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी हनुमंत मिसाले, सुधाकर कवडे, नागेश बोबडे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन जनशक्ती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या वेळी आशुतोष भोसले, बापू पवार, शशिकांत कांबळे, माऊली भोसले आदी उपस्थित होते. विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांनी अभिवादन केले. या वेळी राजू भांड, शिवदास म्हाळगी, मुकुंद मिस्त्री, सदा देवनार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष पर्वती मतदारसंघ व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष गणेश शेरला यांनी अभिवादन केले. सचिन खंडागळे, किरण वैष्णव, धनराज गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button