पुणे : पुढारी वृत्तसेवा : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या प्रकरणात प्राप्तिकरात चोरी केल्याचे पुरावे हाती आले आहेत. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अलाहाबाद शाखेत प्रेम कृष्ण द्विवेदी यांनी परस्पर जमीन विकून आयकर विभागाचा कर बुडवण्याचा प्रकार केला आहे. त्याबाबत 28 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही.
या प्रकरणी प्रवीणकुमार राऊत यांनी ही तक्रार पुणे आयकर विभागाला केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या जमिनीला परस्पर विकून त्याचे लाखो रुपये सचिव मिलिंद देशमुख यांनी हिशेबात न दाखवता विल्हेवाट कुठे लावतात याचा पत्ता नाही. कारण देशमुख यांचा मुलगा चिन्मय देशमुख याला सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे आजीवन सदस्य करून घेण्यासाठी प्रेम कृष्ण द्विवेदी यांना इलाहाबाद शाखेची जमीन विकण्यास संमती दिली. प्रत्यक्षात त्याचे शासकीय मूल्यांकन 73 लाख 4 हजार रुपये असताना फक्त 17 लाखांत विकल्याचे पुरावे मिळाले आहेत.
संस्था हिशेब दाखवत नाही..
संस्थेने हिशेब दाखवण्यास मनाई केली आहे. अलाहाबाद येथील शाखेत 55 लाख रुपयाचा बेहिशेबी मामला बाहेर काढणार्या गिरीश द्विवेदी यांना प्रेम कृष्ण द्विवेदी यांनी संस्थेतून बाहेर काढले. गिरीश कोर्टाच्या पायर्या झिजवत आहे. नागपूर येथील शाखेचे सदस्य स्वर्गीय रमेशचंद्र नेवे यांच्या पश्चात देशमुख परस्पर कारभार करून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या उत्पन्न तकलादू दाखवून इथे खर्च मात्र जास्त दाखवतात. अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार करून शासनाचे कर बुडवून सचिव देशमुख स्वतःच्या मुलाला संस्थेचे सदस्य करून घेण्यासाठी मार्ग अवलंबला आहे. सार्वजनिक संस्था कौटुंबिक होऊ नये यासाठी बदल अर्जावर हरकत घेत संस्थेचे सदस्य लढाई लढत आहे. कारण गोखले यांच्या उद्देशाला मूठमाती देणार्या विद्यमान सचिव मिलिंद देशमुख आणि अध्यक्ष दामोदर साहू यांना सरकारने तथा जनतेने कारवाई करावी अजूनही आयकर विभाग गप्प का, असा प्रश्न तक्रारकर्त्यांने केला आहे.
हेही वाचा :