Crime news : मेकअपवरून राडा; तिघांवर गुन्हा | पुढारी

Crime news : मेकअपवरून राडा; तिघांवर गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वानवडी परिसरात मेकअपच्या पैशावरून एका महिलेसह तिघांनी दुसर्‍या महिलेला शिवीगाळ करून बेसबॉलच्या दांडक्याने मारहाण केल्याचा व तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरी दिवेकर (रा. पेबल पार्क, हांडेवाडी रोड, हडपसर) व तिचे साथीदार सागर आणि मुन्नाभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 36 वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला आणि आरोपी गौरी दिवेकर या एकमेकांच्या ओळखीच्या आहेत. गौरी हिच्याकडे तिच्या आजारपणात फिर्यादीने तिचा खर्च केला होता. नंतर फिर्यादी व तिच्या मैत्रिणीने गौरी हिच्या ब्युटी पार्लरमध्ये मेकअप केला. त्याचा खर्च सर्व औषधासाठी केलेल्या खर्चातून वळविण्याचे ठरले होते. असे असताना आरोपीही फिर्यादी महिलेच्या मेडिकलवर आली. तिने फिर्यादी व तिच्या मैत्रिणीच्या मेकअपचा खर्च मागितला. या दरम्यान गौरीच्या ब्युटी पार्लरमध्ये फिर्यादी हिशोब करण्यासाठी गेल्या असता तेथे त्यांच्यात वाद झाला.

हेही वाचा :

 

Back to top button