पुणे : बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागल्याने महापालिकेने कान्हा हॉटेल चौकातील भुयारी मार्गाचे (ग्रेडसेपरेटरचे) काम 1 जानेवारीपासून हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत सोमवारपासून बदल करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रस्त्याची रुंदी 85 मी. वरून 55 मी. कमी करण्यात आली आहे.
परंतु, यानंतरही अडथळे पाठ सोडत नाही. सुमारे साडेतीन कि.मी. अंतराच्या या रस्त्याचे तीन टप्पे केले आहेत. यामध्ये गोकूळनगर ते खडीमशिन चौकापर्यंत दोन टप्पे तर राजस सोसायटी ते गोकीळनगर असा तिसरा टप्पा करण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येथील जागामालकांसोबत करार करण्यात आले आहेत. भूसंपादनाच्या तिसर्या टप्प्याचा श्रीगणेशा झाला आहे.
खडीमशिन चौक ते कान्हा हॉटेल परिसरादरम्यान वाहतूक वळविण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी दोन स्वतंत्र मार्गिका केल्या जाणार असून, 1 जानेवारीपासून हा बदल अस्तित्वात येईल. कात्रजकडून येणारी वाहतूक कान्हा हॉटेलशेजारील रस्त्यावरून खडीमशिन चौकापर्यंत जाईल, तर खडी मशिन चौकामधून येणारी वाहतूक जुन्या रस्त्याने न जाता इस्कॉन मंदिराशेजारील रस्त्यावरून जाईल, असे कळविले आहे.
हेही वाचा