Yellow Alert Rain : मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात 25 नोव्हेंबरपर्यंत विजांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
दक्षिण भारतामधील आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे संबंधित राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या हवामानावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात विविध भागात अवकाळी पडेल पाऊस पडत आहे.
दरम्यान, सध्या अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा दक्षिण राजस्थान पार करून पुढे गुजरात व अरबी समुद्राच्या उत्तर-पूर्व भागांकडे परतला आहे.
त्याबरोबरच दक्षिण कर्नाटक भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे या दोन्ही स्थितीचा परिणामामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, नगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या भागात हवामान विभागाने जारी केला आहे.
२० नोव्हेबर पासून गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटाची शक्यता आहे.