पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या दुसर्या दिवशीही प्रेक्षकांनी एकांकिका पाहण्यासाठी गर्दी केली. वेगळ्या धाटणीचे विषय, वेगळी मांडणी आणि उत्कृष्ट अभिनयाने युवा कलाकारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. शुक्रवारी सकाळी काही संघांच्या एकांकिका सादर होणार आहेत आणि सायंकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिर येथे सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.
सकाळच्या सत्रात फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी संघाची 'बोबड्या', प्रताप महाविद्यालय, अमळनेर संघाची 'तो पाऊस आणि टाफेटा', वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर संघाची 'समांतर' आणि डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण संघाची 'हॅपी फादर्स डे' या एकांकिका सादर झाल्या. तर सायंकाळच्या सत्रात मराठवाडा विधी महाविद्यालय, पुणे संघाची 'रवायत – ए – विरासत', देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर संघाची 'असणं नसणं', शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर संघाची 'चुकलं तर माफ करा', डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर संघाची 'अल्पभूधारक' या एकांकिका सादर झाल्या.
हेही वाचा