

पुणे : बालेवाडी परिसरात एकाचा खून करून आरोपी पसार झाले होते. ही घटना 21 डिसें. रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी 24 तासांच्या आत परभणी येथून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. राहुल शेषराव रिकामे (19, रा. बालेवाडी) आणि सय्यद जमीर उर्फ बाब्या नूर (20, रा. मातोजीनगर, बालेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
21 डिसेंबर रोजी चतु:श्रृंगी पोलिसांना घटनेची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या मदतीने चेंबरमध्ये टाकलेला मृतदेह बाहेर काढला होता. राजेश कुमार कांबळे (25, रा. बालेवाडी, मूळ रा. कसबे तडवळे, धाराशिव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल रिकामे याच्या बहिणीला राजेश कांबळे हा त्रास देत होता. कांबळे आणि त्याच्या बहिणीने विवाह केला होता. ते एकत्र राहात होते.
राहुल रिकामे याने सय्यद नूर याच्या मदतीने त्याचा खून केला.तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलिस कर्मचारी बाबुलाल तांदळे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, इमफान मोमीन, श्रीधर शिर्के, प्रदीप खरात यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे सारस साळवी आणि अजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा