मागोवा 2023 : सरते वर्ष सांस्कृतिक क्षेत्रासाठी ठरले आनंदाचे

मागोवा 2023 : सरते वर्ष सांस्कृतिक क्षेत्रासाठी ठरले आनंदाचे
Published on
Updated on

पुणे : सण-उत्सवांचा जल्लोष…पुरुषोत्तम करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धांमध्ये दिसलेला युवा जोश…वैविध्यपूर्ण सांगीतिक ते नृत्याविष्काराच्या कार्यक्रमांची मेजवानी अन् व्यावसायिक – प्रायोगिक नाटकांना मिळालेला प्रतिसाद…या आणि अशा महोत्सवांनी, कार्यक्रमांनी सरते वर्ष सांस्कृतिक क्षेत्रासाठी बहारदार ठरले. कोरोना काळानंतर मागील वर्षांपासून सांस्कृतिक विश्व पुन्हा रुळावर आले आणि सरत्या वर्षात सांस्कृतिक विश्वाला नवसंजीवनी मिळाली. भरगच्च कार्यक्रम, नाटकांच्या प्रयोगांची वाढलेली संख्या, सण-उत्सवाचा आनंद…अशा पद्धतीने हे वर्ष सांस्कृतिक विश्वाला कलाटणी देणारे ठरले.

व्यावसायिक, प्रायोगिक, रंगभूमीने झेप घेतली आणि रंगभूमीवर नवीन नाटकांची संख्याही वाढली. नवे प्रयोग, नव्या मांडणीने रसिकांचाही नाटकांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. तर साहित्य क्षेत्रातही अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नूतनीकरण झालेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाचे उद्घाटन तर झालेच. तर पुण्यात झालेली अमळेनर साहित्य संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा असो वा संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांच्या निवडीची पुण्यात झालेली घोषणा हे निमित्त सांस्कृतिक विश्वासाठी खास होते. विश्वात आनंद पसरवला. बालरंगभूमीवरही नवीन नाटके आली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धा, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलला रसिकप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात

महत्त्वाच्या घटना

  • अनेक नवीन प्रायोगिक-व्यावसायिक नाटक रंगभूमीवर
  • गणेशोत्सव, नवरात्र, ईद, ख्रिसमस असे सण
  • उत्साहात साजरे
  • साहित्य विश्वात नवीन लेखकांचा प्रवेश
  • नाट्यगृहांच्या दुरुस्तीच्या कामाला गती
  • गदिमा स्मारकाच्या कामाला वेग
  • पुणे बुक फेअर ते पुणे पुस्तक महोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना
  • मराठी चित्रपटांचा अनुदानाचा प्रश्न सुटला
  • धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मिळालेली चालना
  • शंभराव्या नाट्य संमेलनाची घोषणा

या कलाकार-साहित्यिकांनी घेतला जगाचा निरोप

सरते वर्षात अनेक कलाकार-साहित्यिकांनी जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे, एकपात्री कलाकार वंदन नगरकर, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी, ज्येष्ठ कवी – गीतकार ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके, एकपात्री कलाकार संतोष चोरडिया अशा विविध दिग्गज कलाकार-साहित्यिकांचे निधन झाले आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.

हे विषय ठरले चर्चेचे

नाट्यगृहांच्या समस्या आणि दुरुस्तीचा प्रश्न चर्चिला गेला. एफटीआयआयमध्ये केंद्राने बंदी घातलेला चित्रपट दाखविण्यावरून झालेला वाद, मराठीला भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी साहित्यिक-कलाकारांनी उभारलेला लढा, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील एसी यंत्रणा बंद असल्याचा विषय, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे उपोषण, डॉ. सदानंद मोरे यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे झालेला वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कार्यकारिणीच्या मुदतवाढीवरून झालेला वाद…असे विविध विषय चर्चेचे ठरले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news