धक्कादायक ! विवाहितेला छळ करून पाण्यात बुडवून मारले | पुढारी

धक्कादायक ! विवाहितेला छळ करून पाण्यात बुडवून मारले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शारिरिक व मानसिक छळ करत विवाहितेचे हातपाय ओढणीने बांधत तिला शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडला. या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकऱणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदावा सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. रविवारी (दि. २४) रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मासाळवाडीतील भगवान बिरा गडदरे यांच्या शेततळ्यात ही घटना घडली. फिर्यादीची मुलगी सुरेखा हिला या चौघांनी शारिरिक, मानसिक छळ करत त्रास दिला. पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला पाण्यात बुडवून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनवलकर अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :

Back to top button