Pimpri Crime News : गॅस चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा | पुढारी

Pimpri Crime News : गॅस चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गॅस चोरीप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 21) सायंकाळी ताम्हाणेवस्ती, चिखली येथे ही कारवाई करण्यात आली.
पवन रमेश बिराजदार (26, रा. तळवडे, मूळ रा. कर्नाटक), बालाजी तातेराव टेकाळे (33, रा. देहूरोड, मूळ रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार चेतन सावंत यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. आरोपींकडून 31 हजार 790 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेचीही धडक करवाई

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकानेदेखील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोरेवस्ती येथे धडक कारवाई केली. यामध्ये 33 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन भीमराव इंगळे (30, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश हिंगे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन इंगळे हादेखील घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून इतर ठिकाणी टाकत होता

हेही वाचा

Back to top button