Raigad News : महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांची बदली करा : स्नेहल जगताप- कामत | पुढारी

Raigad News : महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांची बदली करा : स्नेहल जगताप- कामत

महाड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाड शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास ठाकरे गटाच्या महिला आघाडी आणि पदाधिकाऱ्यांना झालेला विरोध दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने दिलेला छुपा पाठिंबा लक्षात घेता महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांची शासनाने त्वरित बदली करावी, अशी मागणी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप- कामत यांनी आज (दि.२३) केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होते. Raigad News

महाड शहरात शुक्रवारी शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले होते. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या महिला आघाडी, आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. Raigad News

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास शिंदे गटाच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी विरोध केला होता. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या सर्व प्रकारांमध्ये पोलिसांची भूमिका दबावाखाली व दडपणाखाली होती. त्यामुळे महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांची तातडीने बदली करावी, तसेच या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अहवाल मागवून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी जगताप- कामत यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button