कौटुंबिक न्यायालयात कार्यरत असलेली फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन ही एक विश्वस्त संस्था असून, त्याची स्वतंत्र घटना आहे. न्यायालयात तीन वर्षांच्या अधिक काळापासून प्रॅक्टिस करणार्या वकिलांना सभासदत्व करून देणे ही असोसिएशनची जबाबदारी आहे. तसेच तो वकिलांचा हक्कही आहे. नियमानुसार पात्र ठरलेल्या वकिलांना घटनेतील तरतुदीप्रमाणे सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन करा. त्यानंतर, अर्जाची छाननी करून त्यांना सभासद करून घ्या. आदेशाची पूर्तता व्यवस्थित होत आहे. की नाही याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल करण्यासाठी आयुक्तांनी ए. बी. जाधव यांची निरीक्षक नेमणूक केली आहे. त्यामुळे, निवडणुकांमध्ये पारदर्शकता येऊन त्या निष्पपक्ष होतील, असेही सहधर्मादाय आयुक्त चव्हाण यांनी निकालात नमूद करण्यात