Weather Update : राज्यात कडकडीत थंडीचा मुक्काम | पुढारी

Weather Update : राज्यात कडकडीत थंडीचा मुक्काम

पुणे : राज्यात ढगाळ वातावरण असले तरी उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या शीतलहरींमुळे राज्यांच्या सर्वच भागात थंडीची लाट आली आहे. विशेषत: विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत गारठा वाढलेला असून, बुधवारी राज्यात सर्वात कमी म्हणजेच 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण आणि थंडीचा कडाका राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे सध्या दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळसह आसपासच्या राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान उत्त्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रावात सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशासह ईशान्य भारतातील सर्वच राज्यांत दाट धुके तसेच तीव्र थंडीची लाट आली आहे. उत्तर भारताकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात थंडी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात थंडी राहणार आहे.

हेही वाचा

Back to top button