निरा रेल्वेस्थानक बनले गैरसोयीचे ; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

निरा रेल्वेस्थानक बनले गैरसोयीचे ; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on
Updated on

निरा : पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील निरा (ता. पुरंदर) येथील रेल्वेस्थानक सध्या प्रवाशांच्या गैरसोयीचे बनले आहे. प्रवाशांना अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुरी विजेची सोय, पिण्याचे शुद्ध पाणी, रेल्वेगाड्यांची उद्घोषणा नाही, सीसीटीव्ही कॅमेरे, टी-स्टॉल अशा अपुर्‍या सुविधांचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. तर निरा रेल्वेस्थानकात पुण्याकडे जाणार्‍या सर्व रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर थांबवाव्यात, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. निरा व परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांतील दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशी नीरा रेल्वेस्थानकामधून अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करीत असतात. मात्र, निरा रेल्वेस्थानक अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुरी विजेची सोय, पिण्याचे शुद्ध पाणी, रेल्वेगाड्यांची उद्घोषणा नाही, सीसीटीव्ही कॅमेरे, टी-स्टॉल अशा अनेक अपुर्‍या सुविधांमुळे प्रवाशांच्या गैरसोयीचे बनले आहे. निरा रेल्वेस्थानक 'ब' वर्ग दर्जाच्या श्रेणीत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जाते. वास्तविक त्याप्रमाणे निरा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांकरिता सोयीसुविधा उपलब्ध आहेत का ? याची पाहणी रेल्वे प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील निरा ते जेजुरीपर्यंत रेल्वेमार्गाचे गेल्या दीड वर्षापासून दुहेरीकरण झाले. मात्र, त्या वेळी रेल्वे प्रशासनाने निरा रेल्वे स्थानकातून पुणे, मुंबई, नागपूरकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी दुसर्‍या प्लॅटफॉर्मची सुविधा नसतानादेखील कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या पुण्याकडे जाणार्‍या सर्व पॅसेंजर रेल्वेगाड्या तिसर्‍या रेल्वे लाईनवर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे. प्रसंगी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा व रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा सर्वाधिक फटका निरा रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांनी अनेकदा लक्ष वेधले असतानाही रेल्वे प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

निरा रेल्वेस्थानक 'आदर्श' होणार का ?
केंद्र सरकारने सन 2017 मध्ये रेल्वेस्थानके आदर्श करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना आखली होती. या योजनेनुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील निरा, जेजुरी व दौंड ही रेल्वे स्थानके आदर्श करण्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चय केला होता. तसेच त्या वेळी महिलावर्गाने निरा रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी खासदार सुळे यांच्याकडे केली होती. मात्र, 5 वर्षे उलटून गेले तरी सीसीटीव्ही बसले नाहीत. त्यामुळे निरा स्टेशन 'आदर्श स्थानक' नक्की कधी होणार ? असा सवाल प्रवाशांसह निरा परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news