यवतमाळ: ग्रेड-पेच्या वाढीसाठी तहसीलदार जाणार बेमुदत संपावर | पुढारी

यवतमाळ: ग्रेड-पेच्या वाढीसाठी तहसीलदार जाणार बेमुदत संपावर

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार संवर्गातील वर्ग २ च्या संवर्गातील सुधारीत ग्रेड पे च्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. सुधारीत ग्रेड पे बद्दल सरकारने कुठलीच भूमिका घेतली नाही. हा प्रश्न अजूनही तसाच कायम आहे. यामुळे संतप्त तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने आझाद मैदानात निदर्शने केली आणि २८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. Yavatmal News
महसूल विभागातील नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी हे राजपत्रित वर्ग २ चे पद आहे. मात्र, नायब तहसीलदार या पदाचे मुळ वेतन राजपत्रित वर्ग २ चे नसल्याने १९९८ पासून आंदोलन सुरू आहे. ५ एप्रिलला सुधारीत ग्रेड पे लागू करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. यामुळे २०२३ मधील बेमुदत संप मागे घेण्यात आला.  Yavatmal News
आठ महिन्यांचा कालावधी संपूनही परिस्थिती तशीच आहे. शासनाला स्मरण करून देण्यासाठी सोमवारी दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. २८ डिसेंबरपासून राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत संपावर जाणार आहेत. राजपत्रित वर्ग २ या पदाचे ग्रेड वेतन ४८०० रूपये करण्याचा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत हे आंदोलन कायम राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. योगेश देशमुख, सचिव एकनाथ बिजवे, कार्याध्यक्ष दिलीप राठोड, सुधाकर राठोड, संदीप सोनकुसरे, •.आर.डी. मेंढे, एस.एम होटे, पी. यू., इंगोले, ए. ए. देशपांडे, एस. टी. जाधव, जे.एन.बन, एम.के. गोल्हर, डी.जी रामटेके, एस.एस. थुल, पी.व्ही. गुल्हाणे, सुनंदा राऊत, वंदना वासनिक, माला गेडाम, किरण किनाके, ममता निचत, रूपाली बेहरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button