हेडलाईनसाठी सत्ताधार्‍यांची शरद पवार यांच्यावर टीका : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

हेडलाईनसाठी सत्ताधार्‍यांची शरद पवार यांच्यावर टीका : खा. सुप्रिया सुळे

वारजे : पुढारी वृत्तसेवा : ’हेडलाइन करण्यासाठी राज्यातील नेत्यांना शरद पवार यांच्यावर टीका करावी लागते. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीका करायला शरद पवार लागतात,’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. अहिरेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले.

याप्रसंगी त्या माध्यमांशी बोलत होत्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, अनिता इंगळे, माजी नगरसेविका सायली वांजळे-शिंदे, माजी नगरसेवक सचिन दोडके आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून शरद पवार यांच्यावर नुकतीच टीका केली आहे. या टीकेला सुळे यांनी या वेळी प्रत्युत्तर दिले. संसदेवरील हल्ला, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण यासह विविध मुद्दयांवरही त्यांनी भाष्य केले. तसेच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाइन दिलेली आहे. ‘आरक्षणाचं काय होतंय, सरकार काही निर्णय घेत काय तेदेखील पाहुया’, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button