Pune Crime News : तो आला पाहुणा म्हणून अन् गेला चोरी करून | पुढारी

Pune Crime News : तो आला पाहुणा म्हणून अन् गेला चोरी करून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने घरातील 4 लाख 35 हजार रुपयांचे दागिने चोरी करून पळ काढला. ही घटना रिद्धी-सिद्धी टियारा सोसायटी आंबेगाव बुद्रुक येथे 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडली होती. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी समर्थ सुनिल रंगरेज (वय 20, रा. मढीवस्ती, सोलापूर) याला अटक केली आहे. याबाबत 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादींच्या नणंदेचा मुलगा आहे. तो 10 डिसेंबर रोजी फिर्यादींच्या घरी आला होता. दरम्यान काही कामानिमित्त फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोक बाहेर गेले होती. त्या वेळी समर्थ याने चोरी केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तो गावी गेला होता. घरातील दागिने पाहिले असता, चोरी झाल्याचे फिर्यादींना समजले. त्यांनी सुरुवातीला समर्थकडे विचारणा केली. मात्र त्याने आपण असे काही केले नसल्याचे सांगितले; परंतु त्याच्या चोरीचा प्रकार हा घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. फिर्यादींनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर चोरीचा हा प्रकार उजेडात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देव करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button