Pune News : पुस्तक महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

Pune News : पुस्तक महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने 24 डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्या लयाच्या मैदानावर नागरिकांसाठी साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन्स कॉर्नर असून, त्यामध्ये चित्रकला, लिहिण्याची कार्यशाळा, कथा-गोष्टींचे उपक्रम, स्टोरीटेलिंग असे कार्यक्रम राहणार आहेत. नागरिकांसाठी साहित्यिक कट्टा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत कवी, साहित्यिक, लेखकांना ऐकता येणार असून, त्यांच्याशी संवाद साधता येईल. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी 'कल्चरल एक्स्ट्रॅवॅगन्झा' उपक्रम असून, त्याअंतर्गत विविध बॅन्डस्, लोकसंगीत, महानाट्य, परिसंवाद आदींचा आस्वाद घेता येईल.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात झाली आहे. या पुस्तक महोत्सवात 15 पेक्षा अधिक भाषांमधील सुमारे अडीच लाख पुस्तके ही 250 स्टॉल्सच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृतीची चव ही 20 पेक्षा अधिक खाण्याच्या स्टॉल्समधून चाखता येणार आहे. या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी 'गाथा शिवरायांची', 'छुक छुक चली कहानी रेल की रेल', 'आवडणारे चित्र काढा', नावीन्यपूर्ण-कल्पकतेने लिहिण्याची कार्यशाळा, 'सुटी आली-सुटी आली', ओरिगामी कार्यशाळा, स्टोरीटेलिंग उपक्रम, अमरचित्रकथा, मंडाला आर्ट, रागावर नियंत्रण ठेवणे, कविता करणे, ओंकार काव्यदर्शन असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम दररोज सकाळी होणार आहेत. नागरिकांसाठी प्रसिद्ध लेखक कुमार विश्वास यांचा 'कवि की कलम से' हा कार्यक्रम राहणार आहे.

लल्लनटॉपचे पत्रकार सौरभ द्विवेदी यांचे विचार ऐकता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांचेही विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी मिळेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील कारागृहात साहित्य निर्मिती करणार्‍या 58 स्वातंत्र्यसैनिकांवर 'कारागृहातील कल्लोळ' हा दृक-श्राव्य कार्यक्रम, 'हिंदुस्थानच्या फाळणीची शोकांतिका' कार्यक्रमात 'व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची' पुस्तकाचे प्रकाशन, 'वाचणारे अधिकारी'अंतर्गत 'आमचा वाचन कारभार', 'ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी' अशा कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

युवक-युवकांसाठी फैजल काश्मिरी बँड, टॅलेंट हंट (नृत्य, गायन, वादन स्पर्धा) आर्मी बँड, कलर्स बँड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंद्रधनुष्य कार्यक्रम, 'पश्मिना के धागो से' अशा बहारदार कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे 'शक्तिदात्री – द लिबरेशमृन ऑफ सीता', तसेच 'तुकाराम दर्शन' हे महानाट्य पाहता येईल. त्याचप्रमाणे साहित्यिक, पत्रकार, लेखक, कवी आदींचे परिसंवाद आणि चर्चासत्र ऐकता येणार आहे. हे संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून, महोत्सवाची वेळ दररोज सकाळी 11 ते 8 अशी राहणार आहे, असे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

पुणे महोत्सवात आज काय?

  • द मॅजिक ऑफ वर्डस : स्टोरीटेलिंग सेशन फॉर किडस् : स.10 ते 10.45
  • फोल्ड अँड फन : ओरिगामी वर्कशॉप : 11 ते 11.45
  • सुट्टी आली-सुट्टी आली : सादरकर्त्या : माधवी वैद्य
  • यंग पिकोसोज : इलस्ट्रेशन वर्कशॉप दुपारी 12 ते 12.45 –
  • टॅलेंट हंट स्पर्धा : दुपारी – 1.30
  • अ सिम्बोसिस ऑफ वर्ल्ड लिटरेटर : ऋचा लिमये – दुपारी 4.30
  • शक्तिदात्री : द लिबरेशन ऑफ सीता :• सायंकाळी 5.30
  • तुकाराम दर्शन महानाट्य : सायंकाळी 6.30

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news