‘पुढारी शॉपिंग उत्सव’ ग्रामीणचा लकी ड्रॉ उत्साहात | पुढारी

‘पुढारी शॉपिंग उत्सव’ ग्रामीणचा लकी ड्रॉ उत्साहात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणार्‍या दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफ.एम. आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’चा ग्रामीण लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी किशोर उलस्वार (रा. बालिंगा, ता. करवीर) व कमलाकर पाटील (रा. केंबळी, ता. कागल) हे ठरले आहेत.

वारणानगर येथील वारणा सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत शनिवारी (दि. 16) हा लकी ड्रॉ मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. सोन्याचे मानकरी ठरलेले किशोर उलस्वार यांनी ओम ज्वेलर्स, बालिंगा येथून खरेदी केली आहे, तर कमलाकर पाटील हे वारणा बँकेचे ग्राहक आहेत.

यावेळी वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, व्हा. चेअरमन उत्तम पाटील, संचालक प्रमोद कोरे प्रताप पाटील, विनायक बांदल, डॉ. प्रशांत जमने, उपाध्यक्ष उत्तम पाटील, संजय जमदाडे, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, ग्रामीणचे जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, वारणा बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर पी. टी. पाटील, ‘पुढारी’चे मार्केटिंग प्रतिनिधी राजू तिवले उपस्थित होते.
बक्षीस विजेते व कंसात कुपन क्र. : प्रथम क्रमांक (अर्धा तोळे सोने) : किशोर मोहन उलस्वार (34498) , कमलाकर पाटील (13830).

द्वितीय क्रमांक (स्मार्टफोन) : मनीष फराकटे (12365), प्रशांत बुगले (33375), सुवर्णा सुतार (12011), राजू फराकटे (34685), सोनाली कुंभार (34156).

‘पुढारी शॉपिंग उत्सव 2023’ हा 15 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. या लकी ड्रॉ योजनेत सहभागी दुकानांतून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले होते. या कुपन्समधून लकी ड्रॉ भाग्यवान ग्राहकांची नावे काढण्यात आली. या लकी ड्रॉमध्ये सोने, स्मार्टफोन, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट या बक्षिसांठी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

Back to top button