

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळाला. त्याला शनिवारी 16 रोजी 53 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दक्षिण कमांडच्या वतीने 'रन फॉर सोल्जर'चे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी भल्या पहाटे पुणेकरांनी धावण्याचा आनंद लुटून विजयदिन साजरा केला.
पाकिस्तानविरुध्द झालेल्या युध्दात भारतीय सैनिकांनी प्राणांची बाजी लावूत युध्द जिंकले. त्यांला 16 डिसेंबर रोजी 53 वर्षे पूर्ण झाली. हा दिवस आपण विजयदिन म्हणून साजरा करतो. या वेळी 1971 च्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणार्या आपल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी 'रन फॉर सोल्जर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकतेचे प्रतीक म्हणून सर्व स्तरांतील नागरिकांनी यात भाग घेतला.
याशिवाय 53 व्या विजय दिवसाच्या निमित्ताने 53 तासांची रनदेखील आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता सुरू झाला व तो 16 डिसेंबर रोजी संपला. हे खरोखरच सहनशीलतेचे एक उल्लेखनीय प्रदर्शन होते, जे या महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक होते.
पुण्यात 'विजय रन'ला दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. ते स्वत: सहभागींसोबत 5 किलोमीटर धावले. मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद, जोधपूर, भोपाळ या भारतातील 10 राज्यांमधील 19 ठिकाणी एकाचवेळी धावण्याचा अनोखा विक्रम नागरिकांनी केला. सुमारे 50 हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. सशस्त्र दलाच्या बँडवादनाने नागरिकांना रोमांचित केले.
हेही वाचा