Pune News : नारायणगावात एटीएसने आठ बांगलादेशींना पकडले | पुढारी

Pune News : नारायणगावात एटीएसने आठ बांगलादेशींना पकडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी, बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगावात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी त्यांनी नारायणगावात धाडसत्र सुरू केले.

त्यात त्यांना आठ बांगलादेशी नागरिक मिळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत पुणे, ठाणे परिसरात आयसीस मॉड्युलच्या संदर्भात कारवाई करत पंधरा जणांना ताब्यात घेतले होते. तर कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता एटीएसने बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानेदेखील यापूर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते.

हेही वाचा

Back to top button