Pune : लोणी भापकरला दुष्काळी स्थितीची पाहणी | पुढारी

Pune : लोणी भापकरला दुष्काळी स्थितीची पाहणी

लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील लोणी भापकर येथील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाकडून बुधवारी (दि.13) करण्यात आली. या भागातील विहिरींतील पाण्याच्या स्रोतांची, पिकांची परिस्थिती, तलावांची माहिती पथकाचे प्रमुख ए. मुरलीधरन, सरोजिनी रावत यांनी घेतली. ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, शेतकरी विठ्ठल गोलांडे यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेची, पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चार्‍याची स्थिती, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेची, तसेच थ्री फेज वीज रात्रीची कशी चुकीची आहे, सर्पदंश, विजेचे धोरण शेतकर्‍यांसाठी अनियमित असल्याची माहिती दिली. लोणी भापकर ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या आरो फिल्टर सुविधेची पथकाने पाहणी केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे संजय काचोळे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, गटविकास अधिकारी अनिल बागल, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, सुभाष बोराटे, ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला शिंगाडे, पशुवैद्यकीय, महसूल, वीज वितरण, कृषी विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button