पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विवेक जाधव, सहायक नगर रचनाकार तथा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे पथक प्रमुख प्रतीक डोळे आदी उपस्थित होते.
देशमुख यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या पथकाकडून यंत्राविषयी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची जनजागृती व प्रात्याक्षिके चांगल्याप्रकारे करावीत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी 29 फेब—ुवारी 2024 पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
हेही वाचा