Pune : अपघाती मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना 40 लाखांचा धनादेश | पुढारी

Pune : अपघाती मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना 40 लाखांचा धनादेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 40 लाख रुपये मिळणार आहेत. शनिवारी (दि.9) झालेल्या लोकअदालतमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे आणि अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. धनंजय रामभाऊ तापकीर (वय 48) हे 20 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3 चा सुमारास दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी भोसरी एमआयडीसीच्या हद्दीत मोशी ते आळंदी रस्त्यावर हवालदार वस्ती येथे टँकरने धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

उपचारासाठी तब्बल 20 लाख रुपये खर्च आला. पत्नी मनीषा, मुलगा हेमंत आणि मुलगी हर्षदा यांनी अ‍ॅड. अनिल देव यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. शेती आणि भाड्याने दिलेले गाळे पाहता त्यांचे दरमहा 30 हजार रुपये असलेले उत्पन्न आणि अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करता अधिकाधिक नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. कुटुंबीय आणि विमा कंपनीमध्ये तडजोड होऊन 40 लाख रुपये देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button