

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पदासाठीची स्पर्धा पूर्व परीक्षा रविवारी (दि.१०) सकाळी ११ ते १२ या वेळेत झाली. या परीक्षेला एकूण २ हजार ४५८ उमेदवारांपैकी २ हजार २१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली तर, २४० उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. (MPSC PSI Bharti)
नाशिकमधील पेठे विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, डी. डी. बिटकाे, वाय. डी. बिटकाे, मराठा हायस्कूल (दोन) अशा सहा केंद्रांवर ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी २०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली हाेती. पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २) डिसेंबर रोजी निश्चित केली होती. परंतू २९ नोव्हेंबर रोजी प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे एमपीएसीकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर २ डिसेंबर तारीख नमूद केली होती. त्याआधारे उमेदवारांना रविवारी (दि.१०) रोजी झालेल्या परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला. (MPSC PSI Bharti)
हेही वाचा :