आगीच्या घटनेची माहिती अग्निशामक केद्रांत दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी कळविण्यात आली. घटना घडली त्याच परिसरात अग्निशामक केंद्र असल्यामुळे दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर इतर ठिकाणच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कारखान्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. या घटनेत महिला जास्त प्रमाणात भाजल्या होत्या. ज्या महिलांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यांना रुग्णवाहिकेची वाट न पाहता टेम्पोतून वायसीएम रुग्णालयात ताबडतोब पाठविले. काही वेळाने घटनास्थळी सात रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.– शाहू व्हनमाने, फायरमनवायसीएमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांपैकी 6 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. हा कारखाना रेडझोन क्षेत्रात आहे. कंपनी आणि जागा मालकाविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.– डॉ. शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.तळवडेतील कंपनीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. रेडझोनच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे लष्कर या हद्दीतील युनिटला वगळण्यासाठी सरकारकडे एनओसी देणार नाही. फॅब्रिकेशनच्या नावाखाली फायर कॅण्डल बनविण्याचा उद्योग करणे योग्य नाही. या भागातील उद्योजकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.– गोविंद पानसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रीज फेडरेशन