स्मार्ट किऑक्स पडले धूळ खात; पालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात | पुढारी

स्मार्ट किऑक्स पडले धूळ खात; पालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने महापालिका भवन, रुग्णालय तसेच, सर्व क्षेत्रीय कार्यालयाता स्मार्ट किऑक्स मशिन बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याचा वापर होत नसल्याने हे कोट्यवधीचे मशिन गेल्या चार वर्षांपासून धूळ खात पडले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने मोठा गाजावाजा करून कोट्यवधी रुपये खर्च करून 50 किऑक्स मशिन बसविण्यात आले. महापालिका भवन, सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय, कर संकलन विभागीय कार्यालय, रुग्णालय व दवाखाने आदी ठिकाणी हे स्मार्ट किऑक्स बसविण्यात आले आहेत.

या किऑक्सला इंटरनोट व वीजजोड देण्यात आलेला नाही. त्याचा वापर कसा करायचा हे नागरिकांनी कळत नाही. अनेक किऑक्स मशिन वापराअभावी धूळ खात आडोशला पडले आहेत. काही मशिन अक्षरश: भंगार म्हणून शेवटची घटका मोजत आहेत. गेल्या चार वर्षांपासून या मशिनचा वापर होत नसल्याने स्मार्ट सिटीने केलेला खर्च पाण्यात गेला असून, नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प असेच असून, त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीची रक्कम वाया गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा

Back to top button