Corruption : 10 हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

Corruption : 10 हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील निंबुत येथे कार्यरत असलेले मधुकर मारुती खोमणे (वय-५८) या तलाठ्यावर १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. खोमणे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एका शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्राची दुरुस्ती नोंद करण्यासाठी खोमणे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. बुधवारी (दि. १७) लाच स्वीकारल्यानंतर त्यांना एसीबीकडून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, सुहास नागगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Back to top button