आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने नियोजन केले आहे. यात्रेसाठी पोलिस आयुक्तालयाकडून सहायक पोलिस आयुक्त 6, पोलिस निरीक्षक 34, उपनिरीक्षक 147, पोलिस अंमलदार 855, वाहतूक पोलिस अंमलदार 280, होमगार्ड 950 असा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. एसआरपीएफच्या 2 कंपन्या, एनडीआरएफची 1 तुकडी, बीडीडीएसची 2 पथके मदतीसाठी असणार आहेत.
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनांसाठी पिवळ्या व स्थानिकांचे वाहनांसाठी गुलाबी रंगाचा पास तयार करण्यात आला आहे. ज्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पास हवा आहे त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात गाडीचे आरसीबुक व वाहन परवान्यासह अर्ज करावा. यात्रा कालावधीत दि. 8, 9, 10, 11 तारखांना आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी तसेच भाविकांनी आपली वाहने 8 तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी लावावीत. शक्यतो वाहने बाहेर काढू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा