बेळगाव : महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली

file photo
file photo

बेळगाव : अमृत वेताळ कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळत मराठी भाषिकांच्या उद्याच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो महामेळावा घेणारच अशा भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी समितीने मागणी केलेल्या व्हॅक्सिन डेपो मैदानासह पाच ठिकाणी सीआरपीसी १४४ नुसार जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे.

कर्नाटक सरकारच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी मराठी भाषकांच्यावतीने दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळी करणे सांगत परवानगी नाकारली जात आहे. यावर्षी देखील परवानगीसाठी रीतसर पोलीस खात्याकडे अर्ज करण्यात आला होता. पण, पोलीस खात्याकडून परवानगी देण्यास टोलवाटोली करण्यात आली. आज पोलीस आयुक्तानी जारी केलेल्या पत्रकारानुसार महामेळायला परवानगी नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, धर्मवीर संभाजी उद्यान, संयुक्त महाराष्ट्र चौक, बसवेश्वर सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी महामेळावा घेण्यात येणार असल्याचे कळविले होते. मात्र कायदा व सुव्यस्थेचे कारण देत त्या ठिकाणी उद्या सकाळी ६ ते मंगळवार (दि. ५) पर्यंत सीआरपीसी १४४ नुसार जमाबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news