दुर्दैवी : कोथरूडमध्ये बांधकाम मजुराचा मृत्यू; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

दुर्दैवी : कोथरूडमध्ये बांधकाम मजुराचा मृत्यू; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : कोथरूडमधील डुक्करखिंड परिसरातील हिल व्ह्यू सोसायटीमध्ये पडदी बसविण्याचे काम करत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम साईटवर सतत होत असलेल्या या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संजय ठाकूर (40, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.

ठाकूर आणि त्याचे साथीदार हिल व्ह्यू सोसायटीमधील इमारतीमध्ये काम करत होते. या वेळी पडदी बसविण्याचे काम सुरू असतानाच ठाकूर खाली पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले. कोथरूड पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button