Pune : आळेफाटा उपबाजारात कांदा दरात वाढ | पुढारी

Pune : आळेफाटा उपबाजारात कांदा दरात वाढ

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि. 28) झालेल्या लिलावात कांदा दरात वाढ झाली. गावरान गोळा कांद्यास प्रती 10 किलो 525 रुपये कमाल दर मिळाला, अशी माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली. आळेफाटा उपबाजारात नवीन लाल सेंद्रिय कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेजारील पारनेर व संगमनेर तालुक्याचे पठार भागातील नवीन लाल सेंद्रिय कांदा येथे विक्रीस येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा दरात काही प्रमाणात घसरण झाली. मात्र, नुकताच झालेला अवकाळी पाऊस यामुळे गावरान कांदा सडू लागला आहे. परिणामी, येथील आवक घटली. काल झालेल्या लिलावात दरात वाढ झाली. नवीन लाल कांदा 2 हजार गोणी, तर गावरान कांदा 5 हजार गोणी शेतकरीवर्गाने लिलावात विक्रीस आणल्याल्याचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे यांनी सांगितले.

प्रतवारीनुसार कांद्याला प्रति 10 किलो मिळालेले दर रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे
गोळा 481 ते 525 रुपये, सुपर गोळा 450 ते 481 रुपये, सुपर मीडियम 400 ते 450 रुपये, गोल्टा व बदला 100 ते 350 रुपये, सिंगल पत्ती 300 ते 401.

हेही वाचा :

Back to top button